साठे फाऊंडेशन, चास नाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:51+5:302021-08-02T04:06:51+5:30
येथील चास नाका परिसरात अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन व मित्रमंडळ यांच्यावतीने आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिवीर ...
येथील चास नाका परिसरात अण्णा भाऊ साठे फाऊंडेशन व मित्रमंडळ यांच्यावतीने आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिवीर वसंतराव नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये योगदान दिले असून शाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अशा अण्णा यांनी मराठीतील विविध साहित्य प्रकार सशक्त व समृद्ध केले असल्याचे मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, माजी सरपंच पी. डी. सानप, विनायकराव शेळके, आनंदराव शेळके, शंकरराव शेळके, भाऊ पाटील शेळके, रामनाथ शेळके, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप भाबड, संघर्ष ग्रुपचे संदीप शेळके, तुकाराम मेंगाळ, फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश कुचेकर, सोपान मंडलिक, नारायण शेळके, अनिल पठारे, भारत दराडे, रामदास सानप, योगेश कुचेकर, रवींद्र शेळके, रतन गोसावी, राजेंद्र दराडे, कैलास बर्के, संतोष कुचेकर, बस्तीराम आगीवले, दत्ता मुंगसे, बाळू कुचेकर, एकनाथ कुचेकर आदीसह अण्णा भाऊ साठे फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत येरेकर यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. संदीप शेळके यांनी आभार व्यक्त केले.
फोटो ओळी : ०१ नांदूरशिंगोटे १
नांदूरशिंगोटे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पी. डी. सानप, विनायकराव शेळके, आनंदराव शेळके, शंकरराव शेळके, भाऊ पाटील शेळके, रामनाथ शेळके, गोपाल शेळके, दीपक बर्के, संदीप भाबड, संदीप शेळके, तुकाराम मेंगाळ, सुरेश कुचेकर, सोपान मंडलिक, नारायण शेळके, अनिल पठारे आदी.
010821\01nsk_7_01082021_13.jpg
नांदूरशिंगोटे येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पी. डी. सानप, विनायकराव शेळके, आनंदराव शेळके, शंकरराव शेळके, भाऊपाटील शेळके, रामनाथ शेळके, गोपाल शेळके, दीपक बर्के, संदीप भाबड, संदीप शेळके, तुकाराम मेंगाळ, सुरेश कुचेकर, सोपान मंडलिक, नारायण शेळके, अनिल पठारे आदी.