सतीमाता-सामतदादाचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 09:46 PM2020-02-07T21:46:08+5:302020-02-08T00:10:08+5:30

वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दीडशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे.

Satimata-Samaddada Yatra | सतीमाता-सामतदादाचा यात्रोत्सव

सतीमाता-सामतदादाचा यात्रोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देवडांगळी : यात्रेसाठी भाविकांची राज्यभरातून गर्दी

वडांगळी : वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दीडशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे.
प्रतिवर्षी माघ पौर्णिमेस होणाºया यात्रेच्या निमित्ताने येथे बंजारा समाजाचा जणू कुंभमेळाच भरत असतो. या समाजातील महिला व पुरुषांनी काळाच्या ओघात आपली पारंपरिक वेशभूषा बाजूला सारल्याचे दिसत असले तरी आपल्या रूढी, प्रथा व परंपरा मात्र जोपासल्या आहेत. धोतर अथवा चोळणा, अंगरखा आणि डोक्यावर लाल रंगाचे पागोटे असा या बंजारा समाजातील पुरुषांचा पूर्वीचा पेहराव असे. तर लाल रंगाचा घागरा, चोळी, कशिदा, कवड्या व आरशांच्या तुकड्यांनी सजविलेली भडक ओढणी, हातात हस्तीदंती कडे, शिंगांच्या व पितळी बांगड्या असा महिलांचा पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसायचा. तथापि, कालपरत्वे राहणीमानात बदल दिसत असून, पुरुष इतरांसारखे शर्ट-पॅण्ट तर स्रिया सहावारी साड्या परिधान करू लागल्या आहेत. या समाजाकडून पूर्वी ऊस- तोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात, मात्र शैक्षणिक सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्याने अनेकजण उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करू लागल्याचेही आढळून येते. प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून काहीजण कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटविला आहे.

यात्रोत्सवासाठी मोठा पोलीस बंदोबस्त
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सतीमाता-सामतदादा यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. त्यासाठी वाहतूक नियोजन करण्यासाठी एमआयडीसी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. आरोग्य खात्याने रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तैनात केले आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने पाण्यासाठी टॅँकरची व्यवस्था केली आहे. मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास संस्थानने दोन जनरेटरची व्यवस्था केली आहे.

विविध कार्यक्रम
माघ पौर्णिमेस शनिवारी दुपारी ४ वाजून २ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे. तथापि, शनिवार हा बोकडबळीसाठी निषिद्ध मानला जात असल्याने शनिवारी जास्त बोकडबळी दिले जाणार नाही. तथापि, रविवार सुटीचा वार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Satimata-Samaddada Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.