कडवाचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:04 PM2020-03-17T23:04:30+5:302020-03-17T23:18:40+5:30
सायखेडा : निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, रामनगर, चाटोरी या गावांना सिंचनाचा एकमेव पर्याय असलेल्या कडवा कालव्याचे आवर्तन सुटल्याने रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांची काळजी मिटली आहे.

निफाड तालुक्याचा दक्षिण भागातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असतो या भागातून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरून गोदावरी नदी वाहते; मात्र गोदावरी नदीपासून उंच असणाºया या गावांना सिंचनाची कोणतीही सोय नाही. केवळ सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागासाठी वरदान ठरलेला कडवा कालवा हा सिन्नरच्या पूर्व भागात जाताना निफाड तालुक्यातील या गावातून जातो. यामुळे येथील विहिरींना फायदा होतो. कालव्यामधील पाणी जमिनीत मुरते आणि ते विहिरींना येते याचा फायदा शेतकºयांना होत असतो.
अनेक वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने मार्च महिन्यात कडवा धरणातील जलसाठा कमी होत होता. पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अजूनही ७० टक्के धरण भरलेली असल्याने मार्च महिन्यात बावीस दिवसांचे आवर्तन सोडण्याचा जलसंपदा विभागाने निर्णय
घेतल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.