उंबरदरीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:00 AM2020-02-22T00:00:46+5:302020-02-22T01:17:51+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाची क्षमता ४८ दशलक्ष घनफूट इतकी असून, धरणातून जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा ही बारमाही चालणारी तालुक्यातील एकमेव योजना आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाणही या भागात मोठ्या प्रमाणात होते. शेतकºयांनी आपल्या शेतात हरभरा, गहू, कांदे, मका आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतलेली असून, ती पिके आता काढणीसाठी येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ठाणगाव, पाडळी येथील शेतकºयांनी सिन्नर येथील लघु पाटबंधारे विभागात संपर्ककरून पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व्ही.डी. पाटील यांच्या आदेशाने लघुपाटबंधारे नंबर दोनचे शाखाधिकारी बी. डब्ल्यू. बोडके यांनी ठाणगाव व पाडळीच्या शेतकºयांसाठी उंबरदरी धरणातून पाच दशलक्ष घनफूट पाणी रब्बी पिकांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आवर्तनामुळे बळीराजा सुखावला आहे.