विद्यापीठाने शुल्कवाढीला स्थगिती दिल्याने पालकांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:11 AM2020-05-27T00:11:18+5:302020-05-27T00:12:40+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने वाढीव शुल्कामुळे अधिक अडचण निर्माण झाली असती. मात्र आता पुणे, नगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने वाढीव शुल्कामुळे अधिक अडचण निर्माण झाली असती. मात्र आता पुणे, नगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली त्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
शुल्क नियमन समितीने काही महिन्यांपूर्वी अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या शुल्कात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती. परंतु आता सदर प्रस्तावित शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.