बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 01:23 PM2020-01-31T13:23:27+5:302020-01-31T13:23:49+5:30
पेठ -तालुक्यातील उत्तरेकडील जवळपास १५ ते २० गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पेठ आगाराने जाहुले पर्यंत बस सुरू केल्याने शेकडो विद्यार्थ्यांची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यकत करण्यात येत आहे.
पेठ -तालुक्यातील उत्तरेकडील जवळपास १५ ते २० गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पेठ आगाराने जाहुले पर्यंत बस सुरू केल्याने शेकडो विद्यार्थ्यांची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यकत करण्यात येत आहे. तालुक्यातील खंबाळे, जूनोठी, तिर्ढ, मोहपाडा, दाभाडी, जांभूळपाडा, म्हसगण, आंबे, पाहुचीबारी, जाहुले या परिसरातील विद्यार्थी पेठ येथे शिक्षणासाठी येजा करत असतात. या रस्त्यावर बसची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने शाळाबाहय विद्यार्थी प्रमाण वाढू लागले होते.पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश टोपले यांनी याबाबत पेठ आगारप्रमुखांची भेट घेऊन समस्या मांडली. परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन पेठ ते जाहुले बस सुरू करण्यात आली. गावात बस आल्याने विद्यार्थासह ग्रामस्थांनी चालक व वाहकांचा सत्कार करून बसचे स्वागत केले. याप्रसंगी महेश टोपले, चिंतामण गाढवे,
गोवर्धन सातपुते, पुष्पराज गायकवाड, देवदत्त भगरे,मुरलीधर टोपले, काशीनाथ गावित, धर्मराज कामडी, युवराज वारडे, सी.डी. सातपुते, पुंडलिक पाडवी, यांचेसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.