दाभाडीत होणार समाधान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:37+5:302021-02-18T04:24:37+5:30
शिबिराच्या पूर्वतयारीसाठी तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रवीण जाधव, तहसीलदार चंद्रजित राजपूत, ...
शिबिराच्या पूर्वतयारीसाठी तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रवीण जाधव, तहसीलदार चंद्रजित राजपूत, नायब तहसीलदार सोमनाथ खैरे यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. महसूल विभागासह विविध विभागांशी संबंधित नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शकपणे करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. लोकांना छोट्या कामांसाठी तालुकास्तरावर हेलपाटे मारावे लागू नये म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहचण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी समाधान शिबिरामार्फत उपलब्ध करून दिली आहे. समाधान शिबिरात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. महसूल विभागामार्फत विविध दाखल्यांसह शिधापत्रिकांचे वितरण, आधार नोंदणी, मतदार यादीच्या शुध्दीकरणासाठी लागणारे विविध अर्जाचे नमुने भरून घेण्याची सुविधा या ठिकाणी करण्यात येणार आहे.