हिसवळ आरोग्य केंद्राच्या कामाने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:39+5:302021-08-29T04:16:39+5:30
नांदगाव : पंचायत राज समितीने तालुक्यातील हिसवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती कार्यालयाला भेटी देऊन आरोग्य केंद्राचे ...
नांदगाव : पंचायत राज समितीने तालुक्यातील हिसवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती कार्यालयाला भेटी देऊन आरोग्य केंद्राचे कौतुक केले. तसेच प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, शिक्षण विभागाच्या एक मुलगी एक झाड या योजनांच्या अभिनंदनाचा ठराव पंचायत राज समितीच्यावतीने करण्यात आला.
गटप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार विक्रम काळे, मेघना दीपक बोर्डीकर, शेखर निकम, कृष्णा गजबे
विधीमंडळ अधिकारी सुदर्शन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, साईनाथ ठाकरेयांनी हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन शस्त्रक्रिया कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, रुग्ण नोंदी व उपचार, तसेच लसीकरणाची आकडेवारी याविषयी माहिती घेतली. डॉक्टर व कर्मचारी यांच्या कामाची नोंद घेताना समिती सदस्य प्रभावित झाले. जनतेच्या आरोग्याची चांगली काळजी घेणारे आरोग्य केंद्र असे कौतुकही त्यांनी केले. एकीकडे कर्मचारी चांगले काम करत असताना गळके छत व विजेची दोषयुक्त कनेक्शन्स यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे इमारत दुरुस्ती प्रस्तावाची शिफारस समितीने केली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत सभापती सुभाष कुटे, उपसभापती मधुबाला खिरडकर, सदस्य सुमन निकम, विद्या पाटील, श्रावण गोरे उपस्थित होते. पंचायत राज समितीने १ ते २८ प्रश्नावलीचा आढावा घेतला. शिवाय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अभिनंदनाचा ठराव देखील केला. आभार प्रमोद चिंचोले यांनी मानले.
--------------------
नांदगांव येथे पंचायत राज समितीने भेट दिली त्यावेळी व्यासपीठावर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (२८ नांदगाव पंचायत)
280821\28nsk_3_28082021_13.jpg
२८ नांदगाव पंचायत