नाशिकच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:38 AM2019-11-22T11:38:52+5:302019-11-22T12:02:43+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.

Satish Kulkarni of BJP as Mayor of Nashik | नाशिकच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची निवड

नाशिकच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची निवड

Next

नाशिक- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.
आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपाला साथ दिली. त्याचप्रमाणे भाजपाच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत भाजपाला पाठिंबा केल्याने भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

राज्यात होत असलेल्या महाशिवआघाडीप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातच भाजपाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले 10 ते 15 भाजपा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते, त्यामुळे 65 नगरसेवक असूनही भाजपा अडचणीत आली होती, मात्र मनसेने भाजपला पाठिंबा दिला तर महाशिवआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला आणि महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भाजपाचा विजय सुकर झाला.

नाशिक महापालिकेत महाशिवआघाडीचा प्रयोग फसल्यानंतर महापौर पदापाठोपाठ उपमहापौरपदी याच पक्षाच्या भिकुबाई किसन बागुल यांची बिनविरोध निवड झाली.  उपमहापौरपदासाठी एकूण 11 अर्ज दाखल झाले होते. सर्वांनी माघार घेतल्याने बागुल यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली

Web Title: Satish Kulkarni of BJP as Mayor of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.