सतीश वसंत आळेकर यांना यंदाचा 'जनस्थान' पुरस्कार जाहीर; कुसुमाग्रज प्रतिष्ठानची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:37 IST2025-01-27T17:36:37+5:302025-01-27T17:37:24+5:30
10 मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.

सतीश वसंत आळेकर यांना यंदाचा 'जनस्थान' पुरस्कार जाहीर; कुसुमाग्रज प्रतिष्ठानची घोषणा
राम देशपांडे
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
10 मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि.27) आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर, कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी केली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.