हरणगावचा सतखांब नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर झळकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:28+5:302021-08-29T04:16:28+5:30

पेठ : तालुक्यातील हरणगाव हे नावाप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले व कलाकारांची खाण असलेले एक सांस्कृतिक गाव. याच गावामध्ये ...

Satkhamb of Harangaon will shine at Nashik Road railway station | हरणगावचा सतखांब नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर झळकणार

हरणगावचा सतखांब नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर झळकणार

Next

पेठ : तालुक्यातील हरणगाव हे नावाप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले व कलाकारांची खाण असलेले एक सांस्कृतिक गाव. याच गावामध्ये साधारण १३ व्या शतकातील यादव काळातील इतिहासाची साक्ष देणारा विजयस्तंभ आहे. यालाच सतखांब असे प्रचलित नाव आहे. ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाच्या पुढाकाराने हरणगावचे ऐतिहासिक वैभव असलेल्या सतखांबची भव्य प्रतिमा नाशिक रोड रेल्वे स्थानकावर झळकणार आहे.

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात वर्षानुवर्षे इतिहासाची साक्ष देणाऱ्या अशा दुर्मीळ वास्तूंना पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकातून देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना पुरातन वास्तूची ओळख निर्माण व्हावी, यासाठी हरणगावचे युवक विजय भरसट यांनी सतखांबची प्रतिमा रेल्वे स्थानकात लावण्यात यावी, अशी कल्पना मांडली. मुळातच कलेची कदर करणाऱ्या हरणगावच्या जयंत जाधव, मनमोहन जाधव, हिरामण भोये, प्रल्हाद गायकवाड, वैभव जाधव आदींनी ग्रामपंचायतच्या निवेदनासह तत्काळ यावर विचार करून नाशिक रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.के. कुठार यांची भेट घेऊन मागणी मांडली. संतोष उफाड, विष्णू भोये, धनगरे, आदींनी चर्चा करून नाशिक रेल्वे स्थानकात सतखांबची भव्य प्रतिमा लावण्याबाबत सकारात्मकता दाखवल्याने पेठ तालुक्याचा ऐतिहासिक ठेवा आता भारताच्या कानाकोपऱ्यात झळकेल, अशी आशा हरणगावकरांंकडून व्यक्त केली जात आहे.

फोटो - २७ हरणगाव हरणगाव ता. पेठ येथील सतखांब.

270821\490427nsk_11_27082021_13.jpg

 फोटो - २७ हरणगाव 

Web Title: Satkhamb of Harangaon will shine at Nashik Road railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.