सातपूरला बंदमुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:40+5:302020-12-09T04:11:40+5:30
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सातपूरच्या शेतकऱ्यांसह व्यापारी व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ...
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सातपूरच्या शेतकऱ्यांसह व्यापारी व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून सहभाग घेतला. या बंदमध्ये सातपूरगावातील श्री छत्रपती शिवाजी मंडई, श्री संत सावता महाराज खोका मार्केट, सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट तसेच अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर परिसरांतील मार्केटमधील व्यापारी, व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून पाठिंबा दिला. बंद यशस्वीतेसाठी सीटू, माकपा, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, परिसरातील शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले. बंद काळात सातपूर पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट==
औद्योगिक क्षेत्र सुरुळीत
केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि.२६ नोव्हेंबर रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे मंगळवारच्या भारत बंदमधून कामगारांना वगळण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्रावर काहीही परिणाम झाला नाही. (फोटो ०८ सातपूर)