सातपूर सात दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 01:31 AM2021-04-17T01:31:49+5:302021-04-17T01:32:13+5:30
कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सातपूर विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. येत्या सोमवार (दि.१९) पासून सात दिवसांसाठी सातपूर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बंदमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सातपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सातपूर विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. येत्या सोमवार (दि.१९) पासून सात दिवसांसाठी सातपूर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बंदमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सातपूर परिसर हा दोन लाखांच्या आसपास लोकवस्तीचा भाग असून कोणतेही मोठे सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. सद्यस्थितीत प्रत्येक घरात जवळपास एक कोरोना रुग्ण आहे. त्यांची मोठी गैरसोय होत आहे. शहरात कुठेही बेड मिळत नाही. रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे सातपूरला तातडीने सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात यावे,अशी मागणी केली जात आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल अयोध्या येथे घेण्यात आली. बैठकीस आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, मनसे गटनेता सलीम शेख, शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, शशिकांत जाधव, योगेश शेवरे,मधुकर जाधव, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, पल्लवी पाटील, शंकर पाटील, अमोल इघे, योगेश लभडे, जीवन रायते, बाळासाहेब जाधव,नितीन निगळ, दीपक मौले,सुनील मौले आदी उपस्थित होते.
, गौरव जाधव, राजेश दराडे, बसपाचे अरुण काळे, गणेश बोलकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोमवारपासून सात दिवस सातपूर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.