सातपूरला उपायुक्तांनी घेतला कोरोनाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:44+5:302021-03-26T04:15:44+5:30
सातपूर विभागाचे नोडल अधिकारी उपायुक्त करुणा डहाळे यांनी सातपूर विभागीय कार्यालयात गुरुवारी आढावा बैठक घेतली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आढावा ...
सातपूर विभागाचे नोडल अधिकारी उपायुक्त करुणा डहाळे यांनी सातपूर विभागीय कार्यालयात गुरुवारी आढावा बैठक घेतली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आढावा बैठकीत सातपूर विभागातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील पेशंट, डेडकेटड कोविड हेल्थ सेंटरमधील पेशंट, कोविड केअर सेंटरमधील दाखल पेशंट, होम आयसोलेशनमधील पेशंट, बेड व्यवस्थापन, सातपूर विभागातील काँटॅक्ट ट्रेसिंग, अँटिजेन आणि आरटी पीसीआर टेस्ट यांची दैनंदिन माहिती घेतली. मास्क न वापरणे, सामाजिक अंतर याबाबतचे नियंत्रण, प्रतिबंधत्मक उपाययोजना, दंडात्मक कार्यवाही, प्रत्येक यूपीएसीत कार्यरत टीमचा सर्वे, कन्टेमेंट झोनमधील कोविड पेशंटबाबत, स्टिकर, बॅनर, हाय रिस्क, लो रिस्क, होम आयसोलेशन, हॉस्पिटलमधील कोविड पेशंट उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती घेतली. तसेच लसीकरणं केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश देऊन यापुढे अचानक भेट देऊन पाहणी केली जाईल असे सूचित केले.
या बैठकीत विभागीय अधिकारी नितीन नेर, नोडल मेडिकल अधिकारी डॉ. योगेश कोशिरे, डॉ. प्रणिता चांदगुडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे, मेरी कोलुर, अपर्णा राऊत, गंगापूर यूपीएसी पर्यवेक्षक सुरेश खांडबहाले, मायको यूपीएसी पर्यवेक्षक प्रकाश शेवाळे, एमएचबी कॉलनी पर्यवेक्षक नितीन देशमुख, संजीवनगर यूपीएसी पर्यवेक्षक नितीन चौधरी, आदींसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो २५ सातपूर) - कोरोना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना करुणा डहाळेसमवेत नितीन नेर, डॉ. योगेश कोशिरे, डॉ. प्रणिता चांदगुडे, माधुरी तांबे, मेरी कोलुर, अपर्णा राऊत, सुरेश खांडबहाले, प्रकाश शेवाळे, नितीन देशमुख, नितीन चौधरी, आदी उपस्थित होते.