सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 02:06 AM2018-04-01T02:06:02+5:302018-04-01T02:06:02+5:30

महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांना सभापतिपद मिळणार आहे.

 Satpur Divisional President of the party MNS | सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात

सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात

Next

गोकुळ सोनवणे ।
सातपूर : महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांना सभापतिपद मिळणार आहे. पक्षीय बलाबल पाहता अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेच्या हातात यापुढील काळातदेखील सभापतिपदाचा रिमोट राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागात प्रथमच भाजपाला सर्वाधिक म्हणजेच नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला आठ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला दोन जागांवर आणि रिपाइंला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यात रिपाइंने शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपा आणि शिवसेनेचे पक्षीय बलाबल सारखे झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाला मनसेचा पाठिंबा मिळेल त्याच पक्षाचा सभापती होणार आहे. म्हणजेच सत्तेची चावी मनसेच्याच हाती राहणार आहे.  मागील वर्षी मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याने माधुरी बोलकर या भाजपाच्या सातपूर विभागाच्या पहिल्या प्रभाग सभापती ठरल्या होत्या. यावर्षी साहजिकच भाजपा मनसेला पाठिंबा देऊ शकते. त्यामुळे मनसेचे योगेश शेवरे यांचा सभापतिपदाचा मार्ग सुकर मानला जात आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हिप सहयोगी सदस्य मुशीर सय्यद यांना बजावला होता. त्यामुळे आता प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपाबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला तर विरोधकांच्या हाती प्रभाग समिती जाण्याची शक्यता आहे. मनसे कुणाबरोबरही राहिली तरी सभापतिपदी मनसेच्याच उमेदवाराची वर्णी लागण्याचीही चर्चा आहे.
मनसेच्या हाती चावी
महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला ९ जागा, शिवसेनेला ८ जागा, मनसेला २ जागा आणि रिपाइंला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे अवघ्या २ जागा मिळालेल्या मनसेने ठरविले त्याच पक्षाचा सभापती होऊ शकतो. मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याने आता दुसऱ्या आणि तिसºया वर्षीचे सभापतिपद मनसेला मिळण्याची शक्यता आहे किंबहुना तशा प्रकारच्या पक्षपातळीवर वाटाघाटी झाल्याचे समजते.

Web Title:  Satpur Divisional President of the party MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.