सातपूरला ८१ जणांकडून १६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:30+5:302021-02-23T04:22:30+5:30
जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विभागीय स्वच्छता ...
जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे,स्वछता निरीक्षक केतन मारु, एकनाथ ताठे, चिंतामण पवार, प्रल्हाद जयकर, कुणाल आहिरे, नीलेश पगार, मयूर आढाव, अवी मौले आदींनी दोन दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या सोमेश्वर मंदिर, नवशा गणपती, अंबड लिंक रोड, अशोकनगर भागातील ८१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून, १६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाने १४६ नागरिकांकडून एक लाख ५६ हजार २८० रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे, कचरा टाकणे, प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे, संचालक कल्पना कुटे यांनी दिली आहे. धडक मोहिमेत विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, स्वच्छता निरीक्षक पी.डी.पाटील, अनिकेत कुलकर्णी, सोमनाथ वाघ, सुरेश शिगाडे आदी सहभागी झाले होते.
===Photopath===
220221\22nsk_39_22022021_13.jpg
===Caption===
सातपूर येथे विनामास्क विरूद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सहभागी झालेले अधिकारी, कर्मचारी.