सातपूरला मनपा, पोलीस आयुक्तांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:49+5:302021-04-09T04:14:49+5:30
शहराबरोबरच सातपूर विभागात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. सातपूर कॉलनी, अशोकनगर, सावरकरनगर, ...
शहराबरोबरच सातपूर विभागात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. सातपूर कॉलनी, अशोकनगर, सावरकरनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर भागात ही रुग्णसंख्या वाढत आहे. सावरकरनगर परिसरातील एकाच भागात जवळपास ३० कोरोना रुग्ण सापडलेले आहेत.त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. हाॅटस्पाॅट ठरलेल्या या भागाला बुधवारी पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपआयुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त करुणा डहाळे, विभागीय अधिकारी नितीन नेर, डॉ. पलोड, डॉ. सुवर्णा वाजे, कोरोना समन्वयक रोहिणी जोशी, तानाजी निगळ, आदींसह पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांचे मार्गदर्शन केले. हा परिसर कंटोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
(फोटो ०८ सातपूर) अशोकनगर येथील सावरकरनगर भागाची पाहणी करून माहिती घेताना मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, सोबत विजय खरात, अशोक नखाते, करुणा डहाळे, नितीन नेर, रोहिणी जोशी, तानाजी निगळ, आदी.