सातपूरमध्ये रात्री अपरात्री होते बत्ती गुल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:36 AM2017-10-25T00:36:28+5:302017-10-25T00:36:33+5:30
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आहे. विशेष म्हणजे बत्ती गुल होण्याचा सिलसिला दिवाळीनंतरही सुरूच असल्याने, महावितरणच्या कारभाराविषयी हिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आहे. विशेष म्हणजे बत्ती गुल होण्याचा सिलसिला दिवाळीनंतरही सुरूच असल्याने, महावितरणच्या कारभाराविषयी हिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वास्तविक सातपूर विभागात महावितरणचा कायम खेळखंडोबा होत असतो. अगदी पावसाच्या शिडकाव्यामुळेदेखील संपूर्ण सातपूरमधील वीज पुरवठा खंडीत होत असतो. मात्र आता पाऊस नसतानाही रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडीत होत असल्याने महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सध्या वातावरणात उकडा जाणवत असल्याने रात्रीच्या वेळेस लहान मुले तथा ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे सातपूर परिसरात आतापर्यंत सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. अशात वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर डासांचा त्रास अधिकच वाढतो. त्यामुळे काही नागरिकांनी तर महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.