सत्संग म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा सहवास ; सुनिल काळे यांनी विशद केले परमेश्वर-ईश्वर यातील भेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:00 PM2019-02-03T16:00:43+5:302019-02-03T16:08:50+5:30
ज्याप्रमाणे क्षमता कमी झालेले चुंबक (मॅग्नेट) दुसऱ्या मोठ्या क्षमतेच्या जवळ ठेवले तर क्षमता झालेल्या चुंबकाची क्षमता पुन्हा वाढून ते कार्यक्षम होते त्याचप्रमाणे साधू, संत व माहात्म्यांच्या सहवासाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन परमेश्वर आणि ईश्वर यामधील भेद सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकतो, असे प्रतिपादन डॉ. सुनील काळे यांनी केले.
नाशिक : ज्याप्रमाणे क्षमता कमी झालेले चुंबक (मॅग्नेट) दुसऱ्या मोठ्या क्षमतेच्या जवळ ठेवले तर क्षमता झालेल्या चुंबकाची क्षमता पुन्हा वाढून ते कार्यक्षम होते त्याचप्रमाणे साधू, संत व माहात्म्यांच्या सहवासाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन परमेश्वर आणि ईश्वर यामधील भेद सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकतो, असे प्रतिपादन डॉ. सुनील काळे यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. ३) स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘ईशस्पर्श’ शिबिरातून उपस्थिताना त्यांनी परमेश्वर आणि ईश्वर या दोन शब्दांमधील अंतर विशद करून सांगितले. डॉ. सुनील काळे म्हणाले, वेद, शास्त्र, पुराणांमधील कथा, प्रसंग, व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गोपनीय पद्धतीने नमूद केलेले ज्ञान कलियुगाशी सुसंगत आहे. हे ज्ञान मूळ प्रवाहात आणले जात नाही. या तत्त्वज्ञानानुसार परमेश्वर आणि ईश्वर दोन वेगळे शब्द आहेत. परंतु अज्ञानापोटी हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. मात्र परमेश्वर म्हणजे डोळ्याला न दिसणारी, परंतु सर्व सृष्टीला चालवणारी एक निर्गुण, निराकार शक्ती असून हीच शक्ती एखाद्या सत्पुरुषाच्या माध्यमातून काम करते तेव्हा त्या ठिकाणी ईश्वर असतो. या शक्तीची जाणीव संत, महापुरुषांच्या सत्संगातून होते. कारण, अशा ठिकाणी निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आपल्यालाही सकारात्मक शक्ती प्रदान करीत असते. त्यामुळे सत्संग म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा सहवास असल्याचे डॉ. सुनील काळे यांनी सांगितले.