कालिदास दिनानिमित्त शनिवारी कार्यक्रम

By Admin | Published: June 21, 2017 12:42 AM2017-06-21T00:42:06+5:302017-06-21T00:42:20+5:30

कालिदास दिनानिमित्त शनिवारी कार्यक्रम

On Saturday, the program is celebrated on the occasion of Kalidas Day | कालिदास दिनानिमित्त शनिवारी कार्यक्रम

कालिदास दिनानिमित्त शनिवारी कार्यक्रम

googlenewsNext


नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास दिनानिमित्त शनिवारी (दि.२४) कालिदास कलामंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात संध्याकाळी ५ वाजता नांदी, उद्घाटन, दीपप्रज्वलन, संध्याकाळी ६ वाजता महाकवी कालिदास यांच्या जीवनावर दत्तात्रय भटमुळे यांचे व्याख्यान, संध्याकाळी ६.३० वाजता पुण्याच्या कलापिनी संस्थेतर्फे ‘ओली सुकी’ या दीर्घांकाचे वाचन, संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या विजिगीशा नाट्य अकादमीतर्फे ‘ईदम सर्वम’ या दीर्घांकाचे सादरीकरण, संध्याकाळी राजेश शर्मा दिग्दर्शित ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकातील प्रवेश व रात्री ८ वाजता संजय जोशी यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. अशा विविध कार्यक्रमांनी कालिदास दिन साजरा होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका व नाट्य परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
 

Web Title: On Saturday, the program is celebrated on the occasion of Kalidas Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.