सत्यम खंडाळेला खंडणी वसुलीप्रकरणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:48 AM2017-10-13T00:48:58+5:302017-10-13T00:49:31+5:30

हिरावाडी परिसरातील रहिवाशाला शेतजमिनीच्या व्यवहारापोटी भ्रमणध्वनीवरून धमकावत तीस लाख रुपयांची खंडणी वसुलीप्रकरणी मनसेचा सरचिटणीस व शिवमुद्रा मित्रमंडळाचा अध्यक्ष सत्यम खंडाळे यास पंचवटी पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) अटक केली.

Satyam Khandale arrested in ransom recovery | सत्यम खंडाळेला खंडणी वसुलीप्रकरणी अटक

सत्यम खंडाळेला खंडणी वसुलीप्रकरणी अटक

googlenewsNext

पंचवटी : हिरावाडी परिसरातील रहिवाशाला शेतजमिनीच्या व्यवहारापोटी भ्रमणध्वनीवरून धमकावत तीस लाख रुपयांची खंडणी वसुलीप्रकरणी मनसेचा सरचिटणीस व शिवमुद्रा मित्रमंडळाचा अध्यक्ष सत्यम खंडाळे यास पंचवटी पोलिसांनी गुरुवारी (दि.१२) अटक केली. खंडाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.१५) पोलीस कोठडी सुनावली. वकीलपत्र काढून घेतल्याचा राग मनामध्ये धरून धमकावणारे अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या शेतजमिनीच्या व्यवहारापोटी खंडणी मागणाºया खंडाळे व एका वकिलावरा याबाबत हिरावाडीरोड पार्वती पॅलेस येथे राहणाºया संतोष शांताराम तूपसाखरे यांनी तक्रार दिली होती. यांनी तक्र ार दाखल केली आहे. तूपसाखरे यांच्या वडिलोपार्जित असलेल्या १८ एकर जमिनीविषयी १९९२ साली दिवाणी दावा दाखल केला होता. तूपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने संशयित वकील खंदारे यांनी तूपसाखरे यांच्याकडे तीस लाख रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. महिनाभरापूर्वी मनसेचा शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे याने खंदारेच्या सांगण्यावरून तूपसाखरे यांना धमकावत ‘खंदारे वकिलाने मागणी केलेली रक्कम माझ्या कार्यालयात मुकाट्याने आणून दे, नाहीतर हात, पाय तोडून टाकेल’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर तूपसाखरे यांनी थेट पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे तक्र ार केली. त्यानंतर सिंगल यांच्या आदेशान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी संशियत खंडाळे व खंदारे यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास उबाळे करीत आहेत.

Web Title: Satyam Khandale arrested in ransom recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.