‘सत्यमेव जयते वॉटर कप’ची बैठक चांदवड : पाणी फाउण्डेशनचा उपक्रम; सहभागाविषयी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:04 AM2017-12-17T00:04:47+5:302017-12-17T00:19:38+5:30

अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पाणी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांदवड तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेतील सहभागी गावांना दूरगामी फायदा होणार आहे.

'Satyamev Jayate Water Cup' meeting Chandwad: Water Foundation initiative; Information about participation | ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ची बैठक चांदवड : पाणी फाउण्डेशनचा उपक्रम; सहभागाविषयी माहिती

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ची बैठक चांदवड : पाणी फाउण्डेशनचा उपक्रम; सहभागाविषयी माहिती

Next
ठळक मुद्देचांदवड तालुक्याची निवडराज्यस्तरापर्यंत गावाचे नाव पोहोचविण्याची संधी उपक्र म यशस्वी करावा

चांदवड : अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पाणी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांदवड तालुक्याची निवड झाली आहे.
या स्पर्धेतील सहभागी गावांना दूरगामी फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामस्तरावरील प्रत्येक घटकाने कोणताही अहंभाव न बाळगता तसेच राजकीय मतभेद बाजूला सारून स्पर्धेत एकदिलाने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले. चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पाणी फाउण्डेशनच्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागासाठी आयोजित मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे होते.
व्यासपीठावर तहसीलदार शरद मंडलीक, जि. प. सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, कविता धाकराव, पं. स. उपसभापती अमोल भालेराव, सदस्य निर्मला आहेर, शिवाजी सोनवणे, देवीदास अहेर आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी भंडारे पुढे म्हणाले की, स्पर्धेतील सहभागाला प्रोत्साहन म्हणून अधिकारी स्वत: गावागावात जाऊन श्रमदान करणार आहेत. राज्यस्तरापर्यंत गावाचे नाव पोहोचविण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध झाली असून, यात जास्तीत जास्त गावांनी हिरिरीने सहभाग घ्यावा व चांदवड तालुक्यात हा उपक्र म यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी पाणी फाउण्डेशनचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक गणेश मांडेकर यांनी स्पर्धेचे आयोजन व सहभागाविषयी सविस्तर माहिती दिली. गावात श्रमदानातून काम उभे करावयाचे असून, त्यासाठी कोणताही निधी दिला अथवा घेतला जाणार नाही. सहभागी गावांपैकी उत्कृष्ट काम करणाºया गावास प्रथम क्र मांकाचे ७५ लाख, द्वितीय क्रमांकाचे ५० लाख, तृतीय क्र मांकाचे ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावास १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्पर्धेसाठी करावयाची कामे व कामांना दिले जाणारे गुण याविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. नितीन गांगुर्डे, पं. स. सदस्य शिवाजी सोनवणे, तालुका कृषी अधिकारी विजय पवार आदींनी मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. महेश न्याहारकर, दत्तात्रय वाघचौरे, मनोज शिंदे, प्रभाकर ठाकरे आदींनी विविध सूचना करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘दुष्काळाशी दोन हात ’ ही ४० मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात आली.
बैठकीचा समारोप ज्ञानेश्वर सपकाळे यांनी केला. बैठकीस सुकदेव जाधव, नंदू चौधरी, अनिल पाटील, उत्तम ठोंबरे, राजेश गांगुर्डे, प्रा. सचिन निकम, गीता झाल्टे, विजय गांगुर्डे, विजूनाना शेळके, रवि पूरकर, बाळासाहेब कोठुळे, सागर आहिरे आदींसह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी आदी उपस्थित होते.
ग्रामसभेत ठराव
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या ७५ तालुक्यांमध्ये चांदवड व सिन्नर तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, या तालुक्यातील गावांनी सहभागी होण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी अर्ज भरून द्यावयाचा आहे. त्यानंतर अर्ज क्र .दोन भरून ग्रामसभेत ठराव मंजूर करु न त्यात सक्र ीय सहभाग घेणाºया किमान पाच जणांची नावे द्यावयाची आहेत त्यात किमान २ महिला असणे आवश्यक आहे. त्यांना चार दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल, त्यानंतरच त्या गावाचा खºया अर्थाने स्पर्धेत सहभाग होणार आहे.

Web Title: 'Satyamev Jayate Water Cup' meeting Chandwad: Water Foundation initiative; Information about participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी