सत्यशोधक युवा सभेतर्फे दुष्काळी भागात अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 05:03 PM2018-10-08T17:03:20+5:302018-10-08T17:07:26+5:30

सत्यशोधक युवा सभेच्या १५ कार्यकर्त्यांच्या चमुने मालेगाव तालुक्यातील प-हाळे येथून दुष्काळी दौऱ्यास प्रारंभ केला. झाडी, एरंडगाव, सावकारवाडी, जेऊर, निंबायती, निमगाव या भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी दुष्काळाबाबत चर्चा करुन उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.

Satyashodhak Yuva Sabha conducts study tour in drought-prone areas | सत्यशोधक युवा सभेतर्फे दुष्काळी भागात अभ्यास दौरा

सत्यशोधक युवा सभेतर्फे दुष्काळी भागात अभ्यास दौरा

Next

दुबार पेरणी करुनही या परिसरात पावसाअभावी पिके करपून गेली. परतीच्या पावसाची प्रतिक्षा होती मात्र तोही काही बरसलाच नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जनावरांचा चारा संपत आल्याने त्यांना स्थलांतरीत करण्याचे काम या भागातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. अशा विदारक स्थितीत हाताला काम नाही. खिशात पैसा नाही म्हणून नाईलाजाने दुस-या तालुक्यात शेतमजुर म्हणून शेतक-यांना काम करावे लागत आहे. प्रशासकीय पातळीवर व राजकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर अनास्था दिसून येत आहे. टॅँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत आहे. सत्यशोधक युवा सभेतर्फे राज्यशासनास या विदारक स्थितीची जाणीव निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. या भागातील आर्थिक, सामाजिक चित्र बदलण्यासाठी सत्यशोधक युवा सभा पुढाकार घेणार आहे. तरुण, शेतकरी, महिला, आदिवासी यांना एकत्र करुन जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत दुष्काळी भागातील शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच यावेळी मतदार जागृती करुन मतांची किंमत ओळखून मते विकू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, बेरोजगारी बाबत आगामी काळात काम केले जाणार आहे. या दौºयात सुभाष परदेशी , सोमनाथ वडगे, यादव साळुंके, संजय जोशी, उमेश अस्मर, किशोर जाधव, गोकुळ वाणी, रमेश सोनवणे, मधुकर माळी, साहेबराव बोरसे, गणेश नापेकर आदि कार्यकर्ते या अभ्यास दौ-यात सहभागी झाले होते.

Web Title: Satyashodhak Yuva Sabha conducts study tour in drought-prone areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.