बचतगटांनी तयार केले सव्वाचार लाख मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:14 PM2020-06-01T22:14:38+5:302020-06-02T00:53:58+5:30
नाशिक : दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने निर्माण झालेला मोठा पेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत सोडविला आहे.
नाशिक : दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने निर्माण झालेला मोठा पेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत सोडविला आहे.
लॉकडाउन व संचारबंदीमुळे आत्मविश्वास हरवून बसण्याच्या तयारीत असलेल्या महिला बचत गटांना मास्क निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन दिल्याने आज जिल्ह्यातील २५३ बचत गटांनी तब्बल ४ लाख ३६ हजार मास्क निर्मिती केली असून, त्यापैकी ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री केली आहे. त्यातून तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. या लॉकडाउनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार गेले. उन्हाळ्यात वाळवण तयार करून लाखो रुपयांची उलाढाल करणाºया बचतगटाच्या हाताचेही काम गेले. गटातील महिलांचाही उपजिविकेचा प्रश्न उभ राहिला. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी या बचत गटांना ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करून त्याची विक्री करावी, असे आवाहन करून बचतगटाच्या काम करणाºया महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. जिल्ह्यातील २५३ बचतगटांनी लिना बनसोडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आजपर्यंत ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री करून ४२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
मास्क निर्मितीतून बचतगटांनी मोठे काम उभे केले. या बचत गटांना प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यातील साडेतीन हजार आशा, ७३९
आरोग्य सेविका, ९ हजार १०६ अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन व साहाय्य केले आहे.
---------------------
तालुकानिहाय मास्कची विक्री व उत्पन्न
जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये निफाड तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातील केवळ ११ बचतगटांनी ९३ हजार ८९० मास्कची विक्री करून ३ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. त्या खालोखाल नाशिक व अन्य तालुक्यांचा समावेश आहे. या मास्क विक्रीतून ४२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे यात आदिवासी महिला बचतगटाची आघाडी राहिली आहे.
------------------------
बचतगटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी या बचतगटांचे काम खूप जवळून पाहिले आहे. त्यात सहभाग घेतला आहे. कोरोना संकटसमयी मला खात्री होती की, बचतगटांच्या माध्यमातून आपण खूप मोठे काम उभे करू शकतो. आमच्या आवाहनाला महिलांनीही प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वासही वाढला.
- लिना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद