नासाका कारखानारोड येथे सव्वादोन लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:13 PM2020-01-20T23:13:23+5:302020-01-21T00:15:43+5:30
पळसे नासाका कारखानारोडवर बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला.
नाशिकरोड : पळसे नासाका कारखानारोडवर बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला.
नासाका कारखानारोड येथे राहणारे विजय गदाधर पाणीग्रही हे गेल्या शुक्र वारी (दि.१७) मुंबई येथे कुटुंबासह घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते. रविवारी (दि. १९) शेजारी राहणारे अनिल घुगे यांनी पाणीग्रही यांना फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा पुढील दरवाजा उघडा आहे. त्यानंतर लागलीच नाशिकरोड पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याच्या कडीकोंडा तोडून घरातील कपाटातील व सुटकेसमध्ये ठेवलेले १ लाख २८ हजार रु पयांची रोकड, सोन्याचे लॉकेट, चार अंगठ्या, कानातले पेंडल, सोन्याची साखळी, असा साडेतीन तोळे वजनाचा ८५ हजार रु पये किमतीचे दागिने असा एकूण २ लाख १३ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्यास अटक
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल चोरणाºया चोरट्यास रेल्वे पोलिसांनी पकडून त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा चोरलेला मोबाइल जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित समीर अहमद अन्सारी (रा. मालेगाव) यास पकडून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात रेल्वे प्रवासाचा मोबाइल चोरून विकला असल्याची माहिती दिली. रेल्वे प्रवासी विजय पाटील यांचा चोरीस गेलेला चोरीस गेलेला मोबाइल जप्त केला आहे.