सावकीपाडा रस्ता दुरु स्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:14 AM2018-02-22T00:14:19+5:302018-02-22T00:14:45+5:30
देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खामखेडा चौफुली ते सावकीपाडा या दोन कि.मी.च्या रस्त्याचे डांबरीकरण होऊन पाच ते सहा वर्षं झाली आहेत. डांबरीकरण ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उखडले आहे. अनेक ठिकाणी चाºया पडल्या आहेत. या रस्त्यावरून खामखेडा, पिळकोस, भादवण, बिजोरे आदी परिसरातील शेतकरी शेतमाल देवळा, चांदवड, उमराणे मार्केटमध्ये नेतात. देवळा येथे जाण्यासाठी हे जवळचे अंतर असल्याने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. या रस्त्यावरून शेतकरी आपला माल देवळा येथील बाजारपेठेत नेतात, परंतु या रस्त्यावरील डांबरीकरण ठिकठिकाणी उखडल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खडे पडले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. समोरून दोन वाहने आल्यास खड्डे टाळताना व काही वेळेस वाहने पार करताना वाहने एकमेकांना लागतात त्यामुळे दोन्ही वाहनधारकांमध्ये वादविवाद होतात. तेव्हा सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.