सेवाव्रती कैवल्य पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:20 AM2019-06-03T00:20:35+5:302019-06-03T00:20:55+5:30
कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवाकार्य करणे महत्त्वाचे असते. कैवल्य पुरस्कार देऊन अशा कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेने केला आहे. चांगल्या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे
नाशिक : कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवाकार्य करणे महत्त्वाचे असते. कैवल्य पुरस्कार देऊन अशा कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेने केला आहे. चांगल्या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे आणि अशाच सेवकार्यातून मोठमोठी कार्ये उभी राहतात, असे प्रतिपादन भाजपाचे राज्य पुनर्वसन प्राधिकरण स्वनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात सेवाव्रती कैवल्य पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भंडारी म्हणाले की, समाजातील सेवाभावी संस्था सामाजाच्या कल्याणासाठी नेहमीच कार्य करतात यामध्ये त्या संस्थांमधील कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग असतो़ प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब सानप, भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, डॉ. विकास गोगटे, शंतनू गुणे उपस्थित होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते विजय साने, श्रीकांत गायधनी, संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे ,भानुदास शौचे, मालती कुरुं भट्टी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
संस्था कार्याध्यक्ष तुषार जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व महर्षी याज्ञवल्क्य प्रतिमापूजनाने कार्यक्र माची सुरु वात झाली. यावेळी पं. रवींद्र देव, पं. वैभव दीक्षित, पं. उपेंद्र देव यांनी मंत्रघोष केला. यावेळी विनिता कुलकर्णी, विद्या खांदवे, मोहिनी भगरे, उदय जोशी, राजन कुलकर्णी, अनिल देशपांडे, दिलीप शुक्ल, प्रतीक शुक्ल, लीना चांदवडकर आदी उपस्थित होते. सन्मानपत्राचे वाचन पं. वैभव दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती शुक्ल यांनी केले. धनंजय पुजारी यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
माधव भंडारी यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी माधवराव भणगे, चंद्रकांत महाजन, राजश्री शौचे यांना कैवल्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचित्र, स्मृतिचिन्ह, पुणेरी पगडी, सन्माननिधी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप आहे. आबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या देणगीतून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्र मातच गुणवंत विद्यार्थी गौरवातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.