सावरकर स्मारक दहा महिन्यांपासून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:32+5:302021-01-20T04:15:32+5:30
कोरोनामुळे शासनाने धार्मिकस्थळांबरोबरच भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मारक बंद केले होते. आता शासनाने धार्मिक मंदिरे जनतेसाठी खुली केली, मात्र ...
कोरोनामुळे शासनाने धार्मिकस्थळांबरोबरच भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मारक बंद केले होते. आता शासनाने धार्मिक मंदिरे जनतेसाठी खुली केली, मात्र स्मारकाकडे दुर्लक्ष केले. गेल्या दहा महिन्यांपासून स्मारक बंद असल्याने धूळ बसून दुरवस्था होण्याची शक्यता आहे. भगूर शहरात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, सर्वत्र व्यवसाय सुरळीत चालू आहेत. अनेक सावरकरप्रेमी, पर्यटक भगूर येथे दर्शन घेण्यासाठी येतात, मात्र त्यांची निराशा होत आहे. शासनाने नियम घालून सावरकर स्मारक खुले करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख, निलेश हासे, श्यामराव भागवत, बाळासाहेब महाले, विजय सोनवणे, कैलास भोर, राजू बलकवडे, विलास भवार यांनी केली आहे. (फोटो १९ भगुर)
कोट :- महाराष्ट्र धार्मिक मंदिरे शासनाने दर्शनासाठी खुली केली, मात्र देशभक्त वीर सावरकर स्मारक खुले नसल्याने मुंबई येथील सावरकर राष्ट्रीय स्मारकात मुख्य समितीची बैठक होणार असून, भगूर येथील सावरकर स्मारक खुले करण्यासाठीचा निर्णय आज होणार आहे
मनोज कुवर, व्यवस्थापक, सावरकर स्मारक, भगूर
फोटो :- भगुर मधील बंद असलेले सावरकर स्मारक