सावरकर स्मृतिदिन : भगूर, कॅम्प, नाशिकरोड येथे विविध कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी सावरकरांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:18 AM2018-02-28T01:18:31+5:302018-02-28T01:18:31+5:30
भगूर : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त देशभक्तीपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
भगूर : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त देशभक्तीपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त सोमवारी पहाटे आप्पासाहेब उपासनी व उमा उपासनी यांच्या सुजाण नागरी स्वच्छता अभियान मंच नाशिक यांनी स्मारकाची साफसफाई करून स्वच्छता केली. त्यानंतर पुरातन विभागाचे सहायक संचालक विलास वाहाणे, उपआवेक्षक वि.वि. धुमाळ, स्मारक व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, सोमनाथ बोराडे यांनी सावरकर जन्मखोलीची विधिवत पूजा केली. तर भगूरपुत्र वीर सावरकर समूहाच्या वतीने आठवणीचा जागर कार्यक्रम मनोज कुवर, दिनेश बेरड, नीलेश हासे, योगेश बुरके, कैलास भोर, प्रशांत लोया यांनी सादर केला प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावरकर यांच्या जीवनावर देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी मुख्याध्यापक तानाजी सोनवणे, महेंद्र महाजन, वंदना आडके, विजया चतुर आदी उपस्थित होते. चारूदत्त दीक्षित यांच्या बागेश्री वाद्यवृंद, मोरया सोशल ग्रुप, दर्शन अकॅडमी आदींनी सावरकर जीवनावर गीते सादर केली. भगूरच्या नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपाध्यक्ष मनिषा कस्तुरे, नगरसेवक दीपक बलकवडे, संजय शिंदे, आर. डी. साळवे, उत्तम आहेर, कविता यादव, प्रतिभा घुमरे, अश्विनी साळवे आदींनी सावरकर स्मारकात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भाजप नेते लक्षण सावजी, उत्तम उगले, भगूर भाजपाध्यक्ष कैलास गायकवाड, तानाजी करंजकर, निलेश हासे, मृत्युंजय कापसे, विलास कुलकर्णी, प्रसाद आडके, कृष्णा लोखंडे यांनी गावातून घोषणा देत स्मारकापर्यंत पदयात्रा काढली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, विशाल बलकवडे, अंबादास आडके, बाळासाहेब कासार, विलास भवार, कैलास यादव, बहिरू शेळके, बाळासाहेब मोरे, विलास यादव, विजय भवार, विलास घोलप आदींनी यांनी स्मारकात अभिवादन केले. यावेळी सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.