सावरकर यांच्या जन्म गावी भगूरला कडकडीत बंद, राहुल गांधी यांचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:48 AM2022-11-18T11:48:55+5:302022-11-18T11:49:03+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या कथित अनुद्गार प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गावी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भाजपाच्या वतीने आज कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
विलास भालेराव, नाशिक-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काढलेल्या कथित अनुद्गार प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गावी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भाजपाच्या वतीने आज कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळपासून बंदला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद आहे. आतापर्यँत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान, आज दुपारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे काल नाशिकमध्ये आंदोलन झाली होती तसेच शेगाव येथे राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे 100 मनसे कार्यकर्ते काल रात्री विशेष वाहनांनी रवाना झाले आहेत त्यांच्या समवेत मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत.