पक्षी वाचवा अभियान : मुलांनो गलोल आणून द्या अन गिफ्ट घ्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 03:26 PM2021-06-05T15:26:26+5:302021-06-05T15:29:11+5:30
पश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे.
नाशिक : पक्षी हा निसर्गाचा महत्वाचा घटक आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पक्षी महत्वाची भूमिका बजावतात. जैवविविधता वाढविणाऱ्या पक्ष्यांना अभय मिळावे आणि त्यांच्यावर ग्रामिण भागात ह्यनेमह्ण भावी पिढीकडून नेम साधला जाऊ नये, या उद्देशाने नाशिक पश्चिम वनविभागाने ह्यगलोल हटवा, पक्षी वाचवाह्ण या अभियानाला जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सुरुवात केली. अभियानांतर्गत शाळकरी मुलांचे प्रबोधन करुन त्यांना पक्ष्यांची शिकारीपासून परावृत्त करत स्वयंस्फुर्तीने गलोलचा त्याग करणाऱ्या मुलांना भेटवस्तू दिली जात आहे.
निसर्ग वाढविण्यासाठी तसेच आपल्या शेतीला बहर आणण्यासाठी परागीभवनासारख्या महत्वाच्या प्रक्रियेत पक्ष्यांचाही काही वाटा असतोच.शेतपीकांसाठी हानीकारक ठरणाऱ्या विविध प्रकारच्या किटकांपासून पक्षी संरक्षण करतात. तसेच निसर्गात होणारे चांगले, वाईट बदलांचे ते संकेतही देतात एवढेच नव्हे तर ऋुतुमान बदलांचीही पुर्वसुचना पक्ष्यांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मिळत असते, म्हणूनच पक्ष्यांना निसर्गाचा खरा दागिना असेही म्हटले जाते. पक्षी संवर्धन काळाची गरज असून जिल्ह्यातील विविध आदिवासी तालुक्यांमध्ये आजही शाळकरी मुलांकडून भटकंती करत पक्ष्यांवर गलोलीच्या सहाय्याने ह्यनेमह्ण साधला जातो. लहानवयातच शिकारीच्यादिशेने होणारी ही वाटचाल रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये जनजागृती करुन त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने वनविभागाने पेठ वनपरिक्षेत्रानूत ह्यगलोल हटवी पक्षी वाचवाह्ण हे अभियान सुरु केले आहे. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांच्या संकल्पनेतून हे जनप्रबोधन अभियान राबविले जात आहे. शनिवारी (दि.५) पेठ तालुक्यातील करंजाळी परिमंडळातील आड गावामध्ये अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
आदिवासी भागांमध्ये महिनभार जागर
पश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे. वनक्षेत्रपाल वनपाल, वनरक्षक यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आपली गलोल जमा करणाऱ्या मुलाला शालेय वस्तु भेट म्हणून दिली जाणार असून महिनाभर या भागात हे अभियान राबविले जाणार असल्याचे गर्ग यांनी सांगितले.
--