‘ब्लू व्हेल’च्या विळख्यातून वाचव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:23 AM2017-08-29T01:23:35+5:302017-08-29T01:23:40+5:30
हातात स्मार्टफोन आल्याने अनेकांना व्हॉट्स अॅप फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सचे तरुणाईला व्यसन लागले आहे.
नाशिक : हातात स्मार्टफोन आल्याने अनेकांना व्हॉट्स अॅप फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सचे तरुणाईला व्यसन लागले आहे. या गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकारही अनेकांना जडले आहेत. पण आता विरुंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ कधी तरुणाईच्या जिवाशी खेळू लागले हे कळलेच नाही. अशा गेम्सच्या विळख्यातून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी बी. डी. भालेकर मैदानावर राजे छत्रपती मित्रमंडळाने या गणेशोत्सवातील देखाव्यातून विघ्नहर्त्या गणपती बाप्पांना साकडे घालून जीवघेणे गेम्स आणि सेल्फीपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करणारा देखावा उभारला आहे.
ध्वनिचित्रफितीव्दारे जनजागृती
या खेळाच्या आहारी जाऊन आतापर्यंत ज्या मुलांनी आत्महत्या केली ती सर्व मुले १२ ते १६ वयोगटातली आहे. रशियामध्ये या खेळामुळे लहान मुलांचे जीव घेतले असून, भारतातही खेळाने मृत्यूचा सापळा विस्तारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोवळ्या जिवांवरील हे विघ्न दूर होऊ दे, असे साकडे राजे छत्रपत्री मंडळाने गणेशाला घातले आहे. या गेम्समुळे होणाºया हिंसक घटना व त्यापासून बचावा यांचे ध्वनिचित्रफितीद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.