वसुली करण्यापेक्षा जनतेला कोविडपासून वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:14+5:302021-03-23T04:16:14+5:30
नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती ...
नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवितानाच राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेलाही टीकेचे लक्ष केले. परमवीर सिंग काय आहे आधी हे ठरवा, परमवीर सिंग जर चांगले आहे, तर गृहमंत्री का हटवत नाहीत, जर गृहमंत्री योग्य तर परमवीर ला का हटवत नाहीत, अशा सवालही किरीट सोमय्या यांनी केला.दरम्यान, सचिन वाजेचा १२ महिन्याचे वसुली कारभाराची चौकशी एनआयएसोबतच अंमलबजावणी संचानालय (ईडी), आयकर विभाग व कंपनी मंत्रालयानेही करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
इन्फो
कोविड नियंत्रणात सरकारला अपयश
राज्यात गेल्या दहा दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारला कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली. राज्यातील १५ जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्रकल्प निर्मितीसाठी निविदा काढून त्यांचे कार्यादेश झाल्यानंतरही जवळपास चार ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी हे प्रकल्प कार्यान्वित झालेले नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकार लसीकरणाविषयी उदासीन असल्याचे सांगतानाच केंद्र सरकारने राज्याला १५ लाख लस पुरवठा केला असून, अद्याप राज्यात केवळ ५० टक्केही लसीकरण झाले नसल्याचे किरीट सोमय्या यांनी नमूद केले.
===Photopath===
220321\22nsk_18_22032021_13.jpg
===Caption===
किरीट सोमय्या