गंगापूर धरणातून पाणी आरक्षणासाठी महाजन यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:43 AM2018-10-25T01:43:25+5:302018-10-25T01:43:47+5:30
यंदा अपुरा पाऊस झाल्याने पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशाप्रकारचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तर नाशिक शहराला बाह्य रिंगरोड आणि अन्य रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
नाशिक : यंदा अपुरा पाऊस झाल्याने पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशाप्रकारचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तर नाशिक शहराला बाह्य रिंगरोड आणि अन्य रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अलीकडेच झालेल्या जिल्हाधिकाºयांकडील पाणी आरक्षणाच्या बैठकीत महापालिकेच्या पाणी आरक्षणावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. यंदा परतीचा पाऊस न झाल्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होण्यास व्यत्यय होऊ शकतो.
याशिवाय पुढील वर्षी पावसाळा लांबल्यास नाशिककरांवर जलसंकट उभे राहू शकते, त्या पार्श्वभूमीवर मुबलक पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी महपौर भानसी यांच्याबरोबरच उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी केली आहे. दरम्यान, नाशिक दौºयावर आलेलेल्या केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. नाशिक शहरात अरूंद आणि नादुरस्त रस्त्यांमुळे वाहतूकीची कोंडी होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवीन रस्ते तयार करण्याची गरज आहे. महापालिकेच्या वतीने भूसंपादन सुरूच असले तरी महापालिकेकडे अपुरा निधी असल्याने रस्त्याची कामे होत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या नूतनीकरणासरशंी केंद्र शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक शहराचा स्मार्ट शहरात समावेश असून, नाशिक शहराचे पर्यटन व भौगोलिक स्थानाचा विचार करता शहरात आवश्यक ते पूल आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी सर्वेक्षण करून खासगी संस्थेच्या मदतीने पाहणी अहवाल तयार करण्यात यावा. राज्य व राष्टÑीय महामार्गांवर आवश्यक आहे अशा ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल बांधावेत, नाशिक शहराच्या सर्व भागात रिंगरोड करावेत अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दिल्ली येथे बैठकीसाठी वेळ दिल्यास सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची तयारीदेखील महापौर भानसी यांनी दर्शविली आहे.
नाशिक शहरातून वाहत जाणाºया पवित्र गोदावरी नदीलगत साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर विकसित केल्यास नदीचे संवर्धन होईल, त्याचप्रमाणे महाराष्टत पर्यटनाच्या दृष्टीने हा पथदर्शी प्रकल्प ठरेल, असेदेखील महापौरांच्या निवेदनात म्हटले आहे.