विसर्जनासाठी आलेल्या महिलेसह मायलेकींना वाचविले; नाशिकच्या गंगाघाटावरील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 06:43 PM2023-09-28T18:43:09+5:302023-09-28T18:44:25+5:30

स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत केल्याने दोघा मुलींसह एका सात वर्षाच्या मुलीचे प्राण वाचले आहे.

saved mother and child with the woman who came for visarjan incident at nashik ganga ghat | विसर्जनासाठी आलेल्या महिलेसह मायलेकींना वाचविले; नाशिकच्या गंगाघाटावरील घटना 

विसर्जनासाठी आलेल्या महिलेसह मायलेकींना वाचविले; नाशिकच्या गंगाघाटावरील घटना 

googlenewsNext

संदीप झिरवाळ, पंचवटी (नाशिक)- : अनंत चतुर्दशी निमित्ताने गुरुवारी (दि.28) गोदा घाटावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या तिघांना पाण्यात वाहून जाताना पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सुखरूपपणे बाहेर काढून जीवदान दिले आहे. अग्निशमन दलाच्या जवान व स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत केल्याने दोघा मुलींसह एका सात वर्षाच्या मुलीचे प्राण वाचले आहे.

गुरुवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने भाविक मोठ्या संख्येने गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गंगा घाटावर दाखल झालेले होते दुपारी पावणे चार वाजेच्या सुमाराला गंगा घाटावरील गांधीज्योत नदीपात्रासमोर तपोवन परिसरातील स्वामीनारायण मंदिर येथे राहणारी 32 वर्षीय रेणू देवी व तिची 7 वर्षाची मुलगी पिंकी अशा दोघीजणी नातेवाईकांसमोर गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या होत्या गोदावरी नदीला वाहते पाणी असल्याने वाहत्या पाण्याचा अंदाज न त्या पाय घसरून पडल्याने दोघी पाण्यात वाहून जाऊ लागल्या सदर घटना परिसरात असलेल्या पंचवटी अग्निशमन दलाचे जवान व्ही बी नागपुरे, एस जे कानडे, यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ पाण्यात उडी घेत महिलेला निळकंठेश्वर मंदिर तर मुलीला पाताळेश्वर मंदिर समोर असलेल्या पात्रातून सुखरूपपणे बाहेर काढले.

दुसरी घटना सायंकाळी पाच वाजता गौरी पटांगण येथे घडली एक महिला गणेश विसर्जन करण्यासाठी आले असताना पाण्यात पाय घसरल्याने ती पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक तसेच पंचवटी यांनी संबंधाच्या जवानांनी तत्काळ पाण्यात उड्या घेत त्या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढून जीवदान दिले असे पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे यांनी कळविल्याचे अग्निशमन दलाचे जवान जगदीश गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: saved mother and child with the woman who came for visarjan incident at nashik ganga ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक