शिरवाडे वणी सरपंचपदी सविता निफाडे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 06:53 PM2020-01-09T18:53:06+5:302020-01-09T18:53:26+5:30
दिलेल्या मुदतीत सरपंचपदासाठी सविता निफाडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्जं दाखल
शिरवाडे वणी : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सवित सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तनपद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी एन. वाय. उगले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जाधव यांचे नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सर्वांनुमते सविता सुनिल निफाडे यांचा उमेदवारी अर्जं दाखल करण्यात आला. सूचक म्हणून उपसरपंच शरद काळे यांनी स्वाक्षरी केली. दिलेल्या मुदतीत सरपंचपदासाठी सविता निफाडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्जं दाखल झाल्याने सरपंचपदी सविता निफाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी संतोष शिंदे, शामराव गायकवाड अश्विनी काळे, प्रतिभा गांगुर्डे, सुरेखा बर्डे, मनिषा बर्डे आदिंसह भास्कर निफाडे, किशोर निफाडे, सुरेश निफाडे, शामराव बर्डे, दिलीप खैरे, गोविंद ठाकरे, जितेंद्र निफाडे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
गावाविकासाला प्राधान्य
कविवर्य कुसुमाग्रजांचे जन्मगाव म्हणून गावात कोट्यवधी रूपयांची विविध विकास कामे होत असून हिच परंपरा कायम राखत गावाविकासाला प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचण्यासाठी कटिबद्ध राहील.
- सविता निफाडे , नवनिर्वाचित सरपंच
फोटो- ०९ शिरवाडेवणी या नावाने सेव्ह
शिरवाडे वणीच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर सरपंच सविता निफाडे यांच्यासह जल्लोष करताना सदस्य व कार्यकर्ते.