सविता पोटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:58 PM2018-05-08T23:58:10+5:302018-05-08T23:58:10+5:30
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील सरपंच सविता अजित पोटे यांना अण्णा मोरे यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच कृषी माउली पुरस्कार २०१८’ देवून गौरविण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील सरपंच सविता अजित पोटे यांना अण्णा मोरे यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच कृषी माउली पुरस्कार २०१८’ देवून गौरविण्यात आले. गावपातळीवर आदर्शवत काम करणाऱ्या महिला सरपंच पोटे यांचा प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी यांच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कुंदेवाडीच्या सरपंच पोटे यांनी गावात सन २०१५ पासून सुमारे पावणेतीन वर्षात गावच्या सर्वांगीण विकासाठी प्रथम १५ आॅगस्ट २०१६ रोजी हगणदारीमुक्त गाव संकल्पना वास्तवात उतरविली. याशिवाय खासदार निधीतून दत्त मंदिराजवळ सभामंडपाचे बांधकाम पूर्ण केले.