सेवा दलातर्फे सावित्री वदते नृत्यनाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:26 PM2020-01-05T23:26:48+5:302020-01-05T23:27:13+5:30
राष्ट्र सेवा दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित उत्सव सावित्रीचा या कार्यक्रमात ‘सावित्री वदते’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली.
मालेगाव : येथील राष्ट्र सेवा दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित उत्सव सावित्रीचा या
कार्यक्रमात ‘सावित्री वदते’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली.
सत्यशोधक पद्धतीने सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्या विवाहाच्या प्रसंगाने या नाटिकेचा प्रारंभ झाला. यानंतर तत्कालीन समाजातील जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर प्रखर भाष्य करणारी सावित्रीबाई फुलेंची पत्रे व कविता यांचे नृत्याद्वारे सादरीकरण करीत झेलम परांजपे यांच्यासह अपर्णा देवधर, रोहन डहाळे, रूपाली कदम, गायक दत्ता मिस्तरी, प्रशांत उजवणे, दीपांजली पाटील, अपूर्वा दाणे, संजय सिंग, नीलम खरे, यशवंत पाटील, हेमांगी पिसाट आदी सहकलाकारांनी व वाद्यवृंद, निवेदकांनी कार्यक्रमात रंग भरले. नाटिकेत अभिनेत्री सुहिता थत्ते आकर्षण ठरल्या. नृत्यांगना झेलम परांजपे यांनी श्रोत्यांचे कौतुक करून सावित्रीबाई फुलेंचे विचारांना कृतीत आणावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दरम्यान राष्ट्र सेवा दल उत्कृष्ट कार्याबद्दल स्वाती वाणी व प्रवीण वाणी या दांपत्यास क्षितिज सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुकाध्यक्ष विकास मंडळ, नचिकेत कोळपकर, सुधीर साळुंके, अशोक फराटे, अशोक पठाडे, सुनील वडगे, किरण सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रविराज सोनार यांनी केले. आभार कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी मानले.