सावित्रीबाई फुले जन्मदिनी ‘लेक शिकवा’चा जागर

By admin | Published: January 3, 2017 11:32 PM2017-01-03T23:32:51+5:302017-01-03T23:33:14+5:30

अभिवादन : जयंतीनिमित्त विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या वतीने शहर परिसरात कार्यक्रम

Savitribai Phule Birthday 'Lake Shikwa' Jagar | सावित्रीबाई फुले जन्मदिनी ‘लेक शिकवा’चा जागर

सावित्रीबाई फुले जन्मदिनी ‘लेक शिकवा’चा जागर

Next

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालय तसेच विविध संस्था व संघटना आदिंच्या वतीने शहर परिसरात उपक्रम राबविण्यात येऊन सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यात आले.
पेठे विद्यालयात ‘बालिका दिन’
नाएसो संचलित पेठे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात ‘बालिका दिन’ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जाधव यांनी सावित्रीबार्इंचे शैक्षणिक कार्य सांगितले. उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे यांनी ‘आजची यशस्वी स्त्री’ची यशोगाथा सांगितली. कुंदा जोशी यांनी सावित्रीबार्इंचा इतिहास व स्त्रीपुढील समस्या सांगितल्या. याप्रसंगी यश जाधव, साहिल उघडे, अनुष्का उघडे, वैष्णवी सूर्यवंशी, यश गुजराथी या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तर गोविंद देशमुख यांनी गीत सादर केले. व्यासपीठावर मुक्ता सप्रे, मंगला देव्हाड, विजय पाटोळे, शर्मिला खानीवाले, शैलेश पाटोळे आदि उपस्थित होते.
निर्मिक फाउंडेशनतर्फे अभिवादन
निर्मिक फाउंडेशन यांच्या वतीने अशोकस्तंभ येथे सावित्रीबाई फुले यांची १८६वी जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेववक शालिनी पवार, रंजना भानसी, माजी नगरसेवक अरुण पवार, बाजीराव तिडके, संजय काळे, आकाश खोडे, संदीप शिंदे, प्रकाश पर्वतीकर, फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत बागुल, उपाध्यक्ष संदीप बच्छाव, सचिव नितीन पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गणेश आमले, अंबादास शेळके, दादाजी बागुल, सचिन बागुल, प्रसाद पवार, हरिभाऊ महाजन, बाबासाहेब खरोटे, हेमंत गोवर्धने, दुर्गा बागुल, रोहिणी गांगुर्डे, आदिंसह नागरिक उपस्थित होते.



 

Web Title: Savitribai Phule Birthday 'Lake Shikwa' Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.