सावित्रीच्या लेकींचा कोरोना जागृतीसाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:04+5:302021-03-29T04:09:04+5:30

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, प्रमोद शुक्ला, डॉ. जतीन कापडणीस, नगरसेविका पुष्पा गंगावणे, ज्योती भोसले, राजेश गंगावणे यांच्या समक्ष कोरोना ...

Savitri's Lake's Corona Awareness Initiative | सावित्रीच्या लेकींचा कोरोना जागृतीसाठी पुढाकार

सावित्रीच्या लेकींचा कोरोना जागृतीसाठी पुढाकार

Next

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, प्रमोद शुक्ला, डॉ. जतीन कापडणीस, नगरसेविका पुष्पा गंगावणे, ज्योती भोसले, राजेश गंगावणे यांच्या समक्ष कोरोना जागृतीपर पथनाट्य उत्कृष्ट रीतीने पोवाड्यातून संगीतपर सादर करण्यात आले,. कोरोना विषाणूची होणारी लागण, लक्षणे, घ्यावयाची काळजी, उपाययोजना तसेच लसीकरण याबाबत जागृती संदेश देण्यात येत आहे. यावेळी सदर पथनाट्याचे भुसे यांनी कौतुक करीत पुढील काळात पथनाट्य सादर करण्यासाठी नियोजन करून गावोगावी प्रसारित करण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केले. पथनाट्यासाठी साधना ब्राह्मणकर कुकाणे, मनीषा सावळे (महालक्ष्मीनगर), मनीषा पाटील (अस्ताने), दीपाली शिंदे (मानके), संगीता पाटील (पिंपळगाव), मनीषा ठाकूर (सरस्वती विद्यालय), शोभा बच्छाव (टेहरे), ज्योती पाटील (विंध्यवासिनी नगर), छाया देसले (टिपे), मनीषा कुलकर्णी (सरस्वती विद्यालय), लता सूर्यवंशी (कंधाणे), विजया भदाणे (गणेशनगर), नूतन चौधरी (टेहरे), छाया पाटील (हनुमाननगर), अश्विनी सोनवणे (पाटणे), जोत्स्ना काकळीज (चिंचगव्हाण), गटप्रमुख वैशाली भामरे (माणके) यांनी पात्रे सादर केलीत. यावेळी संघटना पदाधिकारी सुभाष पाटील, संजय पगार, वाल्मीक घरटे, शरद ठाकूर, नीलेश नहिरे, सुरेश ब्राम्हणकर, सुनील पाटील, पवन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोट...

मालेगाव तालुक्यातील महिला शिक्षिकांनी शाळा, कुटुंब सांभाळत समाजाप्रती वेळ देत कोरोनाविषयीचा संपूर्ण गाभ्याचा विचार करून पथनाट्य सादर केले जात आहे. याद्वारे नागरिकांना उत्तम संदेश मिळणार आहे.

- दादा भुसे, कृषिमंत्री

गावोगावी कोरोनाविषयीची काळजी, सुरक्षा, नियम, उपाययोजना, प्रतिबंध, लसीकरण याविषयी संभ्रम, अज्ञान, भीती आहे. लोकांना याविषयी माहिती व मार्गदर्शन मिळावे भीती दूर व्हावी, संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून हे पथनाट्य सादर करत आहोत.

- वैशाली भामरे, गटप्रमुख, मालेगाव

फोटो ओळी - २८ मालेगाव १

दाभाडी येथे कोरोनाविषयक जागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. त्याप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, प्रमोद शुक्ला. समवेत गटप्रमुख वैशाली भामरे, मनीषा सावळे, छाया देसले, मनीषा पाटील आदी.

===Photopath===

280321\28nsk_14_28032021_13.jpg

===Caption===

दाभाडी येथे कोरोना विषयक जागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. त्याप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, प्रमोद शुक्ला. समवेत गटप्रमुख वैशाली भामरे, मनीषा सावळे, छाया देसले, मनीषा पाटील आदी.

Web Title: Savitri's Lake's Corona Awareness Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.