‘ईद मुबारक’ म्हणा, पण गळाभेट अन् हस्तांदोलन टाळा !

By अझहर शेख | Published: May 24, 2020 05:13 PM2020-05-24T17:13:28+5:302020-05-24T17:20:27+5:30

यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Say ‘Eid Mubarak’, but avoid hugs and handshakes! | ‘ईद मुबारक’ म्हणा, पण गळाभेट अन् हस्तांदोलन टाळा !

‘ईद मुबारक’ म्हणा, पण गळाभेट अन् हस्तांदोलन टाळा !

googlenewsNext
ठळक मुद्देईदच्या सणावर कोरोनाचे सावट हस्तांदोलन व गळाभेट पुर्णपणे टाळाईदचे सामुहिक नमाजपठण रद्द

नाशिक :रमजान ईदच्या औचित्यावर गळाभेट-हस्तांदोलन करत ‘ईद मुबारक’ची शुभेच्छा देण्याची प्रथा आहे; मात्र यावर्षी ही प्रथा पाळू नये, असे आवाहन धर्मगुरूंसह जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाकडूनही करण्यात आाले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिकांनी आपआपसांत ‘डिस्टन्स’ ठेवणे बंधनकारक आहे. ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याकरिता हस्तांदोलन व गळाभेट पुर्णपणे टाळावी जेणेकरून कोरोनाच्या संक्रमणाचा धोका निर्माण होणार नाही. यावर्षी संपुर्ण रमजान पर्व कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. रमजान ईदच्या सणावरही कोरोनाचे सावट आहे. यामुळे सामुहिक नमाजपठणाचे ठिकठिकाणी होणारे सोहळेही रद्द करण्यात आले आहे. यावर्षी ईदची स्पेशल डिश ‘शिरखुर्मा’चा आस्वाद आपआपल्या घरी कुटुंबियांसोबतच घ्यावा लागणार आहे. मित्र-परिवार, नातेवाईकांच्या घरीदेखील नागरिकांना ये-जा करणे अवघड होणार आहे. कोरोनाचा आजार टाळण्यासाठी नागरिकांना यंदा ईद आपल्या घरीच राहून साजरी करावयाची आहे.

यंदाची ईद मुस्लीम बांधवांना अगदी साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. किराणामध्ये काही प्रमाणात सुकामेवा खरेदी करून दुधाच्या सहाय्याने पारंपरिक प्रथेनुसार ‘शिरखुर्मा’ तयार करून घरांमध्ये फातिहापठण केले जाणार आहे. यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था राज्यातील विविध शहरांमध्ये पुढे आल्या आहेत.
संपुर्ण रमजान पर्व काळात सर्वच शहरांमधील मशिदीही लॉकडाउन राहिल्या. मशिदींमध्येही मागील दोन महिन्यांपासून केवळ पाच व्यक्ती नमाजपठण करत आहेत. मशिदींमध्ये गर्दी होणार नाही, याची पुर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.
---
कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता रमजान ईद अगदी साधेपणाने साजरी केली जात आहे. यावर्षी ईदचे सामुहिक नमाजपठण रद्द करण्यात आले आहे. ईदगाह मैदानावर नमाजपठणाचा पारंपरिक सोहळा यंदा होणार नाही. नागरिकांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाउनचे नियम पाळावेत. ईदच्या शुभेच्छा देताना अलिंगण व हस्तांदोलन शक्यतो टाळावे, जेणेकरून कोरोनाचा धोका उद्भवणार नाही. आपआपल्या घरांमध्येच राहून नमाजपठण करावे.
- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब, नाशिक

 

Web Title: Say ‘Eid Mubarak’, but avoid hugs and handshakes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.