....म्हणे आरसा घालवतो बाइकचा ‘शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:10+5:302020-12-23T04:12:10+5:30
दुचाकींना आरसे नसल्याने दुचाकीस्वार जणू एकप्रकारे आपले पाठीमागील दोन डोळेच गमावून बसलेला असतो. पाठीला डोळे आहे का? असे ...
दुचाकींना आरसे नसल्याने दुचाकीस्वार जणू एकप्रकारे आपले पाठीमागील दोन डोळेच गमावून बसलेला असतो. पाठीला डोळे आहे का? असे वाक्य सर्रासपणे दैनंदिन व्यवहारात वापरले जाते; मात्र दुचाकींना असलेले आरसे त्या दुचाकीस्वारासाठी खरोखरच पाठीचे डोळे म्हणून एकप्रकारे भूमिका बजावतात, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण पाठीमागून येणारे वाहन आणि त्यांचा वेग याचा अंदाज आरशांमुळे दुचाकीस्वारांना बांधता येणे सोपे होते. वळण घेतानासुध्दा पाठीमागील वाहन आपल्या वाहनापासून सुरक्षित अंतरावर आहे का, याचा अंदाज घेणे शक्य होते; मात्र बेफिकीर तरुण दुचाकीस्वार मंडळी सर्रासपणे दुचाकींचे आरसे खोलून घरी ठेवून देताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस आरसे न वापरण्याची वेगळीच ‘क्रेझ’ शहरात वाढीस लागत आहे.
---इन्फो------
२०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड
मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकींचे आरसे काढून ठेवणे हा सामान्य गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यात शहर वाहतूक शाखेकडून किमान २०० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र प्रादेशिक परिवहन विभागाकडून केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करून यापेक्षाही जास्तीचा दंड होऊ शकते. कोल्हापूरमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) विशेष मोहीम हाती घेत आरसे सक्तीचे केले आहे.
--इन्फो--
या आहेत आवश्यक गोष्टी
दुचाकी चालविताना डोक्यावर हेल्मेट अन् दुचाकीला दोन्ही बाजूंचे आरसे आवश्यक आहे. यासोबतच वैध वाहन परवाना (लायसन्स), वैध विमा उतरविल्याचे कागदपत्र (इन्शुरन्स), पीयूसी प्रमाणपत्र, आरसी कार्ड किंवा पुस्तक या गोष्टी दुचाकीचालकाने सोबत बाळगणे गरजेचे आहे.
---कोट--
दुचाकी चालविताना वेगमर्यादेचे पालन सर्वप्रथम बंधनकारक आहे. तसेच डोक्यावर हेल्मेट परिधान करणे, दुचाकींना दोन्ही बाजूंचे आरसे शाबूत ठेवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. शहरासह जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकांकडून अचानकपणे याबाबत तपासणी मोहीम राबिवली जाऊ शकते. त्यामुळे दुचाकीचालकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- विनयकुमार अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक
----
फोटो आर वर २२मिरर/ २२टुव्हिलर नावाने सेव्ह केले आहेत.
--
डमीचा फॉरमॅटदेखील २२ टुव्हिलर मिरर नावाने सेव्ह आहे.