बाप्पाच्या आगमनासाठी नाशिकला सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:12 PM2018-09-07T18:12:10+5:302018-09-07T18:13:09+5:30

थर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल

Sazali market for Nashik to reach Bappa | बाप्पाच्या आगमनासाठी नाशिकला सजली बाजारपेठ

बाप्पाच्या आगमनासाठी नाशिकला सजली बाजारपेठ

Next
ठळक मुद्देथर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल

नाशिक : गणेशोत्सवाची जोरदार तयारी सध्या शहरात सुरू आहे. मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तर बाप्पांच्या स्वागतासाठी विविध सजावटींच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे, उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.
गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने दररोज लाखोंची उलाढाल सुरू आहे. महागाई आणि मंदीचे सावट गणेशोत्सवावर आहेच; पण तरीही लाडक्या गणरायाच्या स्वागतात कोणतीही कमी राहू नये यासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आरास सजावटीला लागणारी चमकी, माळा, सजावटीचे साहित्य, आकर्षक मखरी दाखल झाल्या आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सराफ बाजार यांसह उपनगरात सर्वत्र सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण परिसर आकर्षक चमकी व मखरींनी व्यापलेला आहे. बाजारात विविध प्रकारांमध्ये मखरी उपलब्ध असून, गणेशोत्सव काळात मखरींना मागणी वाढली आहे.
यंदा थर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून घरगुती गणेशोत्सवासाठी मखरींना मागणी वाढली आहे. या पर्यावरणस्नेही मखर फोल्डेबल असल्याने त्यांचा दीर्घकाळ वापर करता येणार आहे. याशिवाय मोत्यांचे, कापडी तोरण, वॉल हॅगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक आवडीने खरेदी करीत आहेत. यंदा गणपती पाठोपाठ लगेचच गौरींचेही आगमन होत असल्याने गौरीच्या साजशृंगाराच्या साहित्याचीही बाजारात रेलचेल आहे. गौरीच्या रेडिमेड साड्या, दागिने, गजरे, वेण्या, खण, मुखवटे आदींनी बाजारपेठ गजबजून गेली आहे. असंख्य पर्याय उपलब्ध होत असल्याने काय घ्यावे आणि काय नको असे महिलांना होत आहे. गौरी गणपतीच्या आराससाठी लायटिंगच्या माळा, फोकस लाइट यांच्या खरेदीवरही भर दिला जात आहे.

 

Web Title: Sazali market for Nashik to reach Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.