क्यूआर कोड स्कॅनिंग सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:31 AM2019-09-29T00:31:22+5:302019-09-29T00:31:46+5:30

शहरातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी क्यूआर कोडद्वारे गस्तीपथकांची उपस्थिती नोंदविण्याची प्रणाली सुरू करण्यात आली असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५० क्यूआर कोड बसविण्यात आले आहे. मात्र या क्यूआर कोडच्या माध्यमातून आपली संबंधित भागातील उपस्थिती नोंदविण्यासाठी गस्ती पथक व बीट मार्शलमधील पोलीस कर्मचारी अनेकदा परिसरातील घटना घडामोडींकडे दुर्लक्ष करून पुढील कोड स्कॅन करण्यासाठी निघून जात असल्याने ही क्यूआर कोडची सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे.

 Scanning QR code on the path of forced thieves | क्यूआर कोड स्कॅनिंग सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर

क्यूआर कोड स्कॅनिंग सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर

Next

इंदिरानगर : शहरातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी क्यूआर कोडद्वारे गस्तीपथकांची उपस्थिती नोंदविण्याची प्रणाली सुरू करण्यात आली असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५० क्यूआर कोड बसविण्यात आले आहे. मात्र या क्यूआर कोडच्या माध्यमातून आपली संबंधित भागातील उपस्थिती नोंदविण्यासाठी गस्ती पथक व बीट मार्शलमधील पोलीस कर्मचारी अनेकदा परिसरातील घटना घडामोडींकडे दुर्लक्ष करून पुढील कोड स्कॅन करण्यासाठी निघून जात असल्याने ही क्यूआर कोडची सक्ती चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे.
इंदिरानगर भागात गस्ती पथके आणि बीट मार्शल क्यूआर कोड स्कॅनिंग करण्यात बीट मार्शल व्यस्त असल्याने परिसरात गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. या भागात सोनसाखळी चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सोनसाखळी, घरफोडी आणि अन्य गुन्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विल्होळी जकात नाका ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द असून, या भागात सोनसाखळी चोऱ्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दील वेगवेगळ्या ठिकाणी ५० क्यूआर कोड बसविण्यात आले आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन केल्याशिवाय बीट मार्शल व गस्तीपथकांची त्या भागातील उपस्थिती नोंदविली जात नाही. विशेष म्हणजे इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द विल्होळी जकात नाका ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपर्यंत असून, या भागातील विविध उपनगरांचा समावेश होतो. यावेगवेगळ्या ठिकाणी असलेले ५० क्यूआर कोड स्कॅन करण्यातच गस्तीपथक आणि बीट मार्शलचा सर्व वेळ जात असल्याने त्यांना परिसरातील घटनांकडे विशेष लक्ष देता येत नाही. नेमका याच गोष्टींचा सोनसाखळी चोरट्यांसह, घरफोड्यांसारखे गुन्हेगारांनी फायदा उचलून या भागात कारवाया वाढवल्या असून, टवाळखोरांचा उपद्रवही वाढला आहे.
दोन तासांनी
स्कॅनिंग बंधनकारक
गस्ती पथकांना क्यूआर कोड प्रत्येक दोन तासांनी स्कॅन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गस्ती पथके व बीट मार्शल अनेकदा आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करून आपल्या नियोजित वेळेत कोड स्कॅन करण्यासाठी निघून जातात. तसे केले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गस्ती पथकांना जाब विचारला जात असल्याने बीट मार्शल व गस्ती पथकांचा कोड स्कॅन करण्यावरच भर असतो. गस्ती पथकांनी क्यूआर कोड स्कॅनिंगवर लक्ष केंद्रित केल्याने चोराट्यांना आणि टवाळखोरांना एक प्रकारे मुभाच मिळत असून, या भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीच्या घटनांसह गुन्हेगारीत वाढ होत आहे.

Web Title:  Scanning QR code on the path of forced thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.