जलवाहिनीतील पाणीचोरीमुळे टंचाई
By admin | Published: March 24, 2017 11:42 PM2017-03-24T23:42:05+5:302017-03-24T23:42:31+5:30
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे.
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून देशवंडी येथे पाणी पोहोचत नसल्याने व तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.देशवंडी, जायगाव, वडझिरे, मोह, चिंचोली आदि गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नायगावसह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून पाणीचोरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या योजनेतील शेवटच्या व उंचावर असलेल्या देशवंडीकरांना गेल्या महिनाभरापासून पाणीच मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट वाढली असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप गेल्या दोन महिन्यापासून या वाढत्या चोऱ्यांमुळे नायगाव व देशवंडी येथील जलकुंभापर्यंत मुख्य जलवाहिनीचा दाब कमी झाल्याने पाणी पोहोचत नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण होत आहे. मोह येथील योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून नायगाव येथील पंपिंगपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीतून अनेक ठिकाणी पाणी चोरी होत असल्याचे बोलले जात आहे. या वाढत्या पाणीचोरीमुळे ही योजना ऐन उन्हाळ्यात कुचकामी ठरत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वा वाढत्या चोऱ्या थांबवून नायगाव व देशवंडी या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी देशवंडी व नायगाव येथील महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
या योजनेद्वारे मिळणाऱ्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक-पुणे महामार्गाच्या कामामुळे या योजनेला चेहडी येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे वारंवार घडत असल्याने ही योजना अधून मधून बंद होत असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या मुख्य जलवाहिनीतूनच पाणीचोरीचे प्रमाण वाढत चालल्याने नायगाव ते देशवंडी येथील या योजनेचे जलकुंभ पूर्णक्षमतेने भरले जात नसल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे.