जलपातळी खालावल्याने पांगरी परिसरात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 05:37 PM2019-04-25T17:37:53+5:302019-04-25T17:38:07+5:30

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातल्या पांगरी परिसरात एप्रिल महिन्याच्या पुर्वार्धातच भुगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्हे आहेत.

The scarcity in the Pangri area due to the water level decrease | जलपातळी खालावल्याने पांगरी परिसरात टंचाई

जलपातळी खालावल्याने पांगरी परिसरात टंचाई

Next

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातल्या पांगरी परिसरात एप्रिल महिन्याच्या पुर्वार्धातच भुगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्हे आहेत.
मनेगावसह १६ गाव व राष्टÑीय पेयजल योजनेतून सध्या पांगरीत पंधरा दिवसाने पाणी पुरवठा होत आहे. परिसरातील पाझर तलाव व इतर जलाशय कोरडेठाक आहेत. बहुतांशी विहीरींची पाण्याची पातळी खाली गेली असून पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करु पाहत आहे. पांगरी परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीतील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यातील तपमानचा पारा चढल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

Web Title: The scarcity in the Pangri area due to the water level decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी