विहिरींनी तळ गाठल्याने टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:44 PM2020-04-11T20:44:36+5:302020-04-12T00:26:10+5:30

येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.

 Scarcity of wells reached the bottom | विहिरींनी तळ गाठल्याने टंचाई

विहिरींनी तळ गाठल्याने टंचाई

Next

येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतानाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
डोंगराळ व कायमच दुष्काळी भाग म्हणून उत्तर-पूर्व भागाची ओळख आहे. दरवर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये परिसरातील महिला व तरुणांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने पशुधनाची पाण्यासाठी मोठी वणवण होते. ममदापूर येथील गावालगत असलेला गावठाण बंधारा व विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासाठी ममदापूरवासीयांना भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी, सामान्य माणसेही चारा पाण्यासाठी बाहेरगावी जाणे पसंत करतात. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी असल्याने बाहेरगावी जाणे शक्य नसल्याने पशुधन सांभाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रलंबित सिंचनाचे प्रकल्प तातडीने शासनाने मार्गी लावावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जानराव यांनी केली आहे.

Web Title:  Scarcity of wells reached the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक