अभंगरंग कार्यक्रमात भक्तिरंगाची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:46+5:302021-06-25T04:12:46+5:30
नाशिक : ‘सप्तरंगोत्सव’ कार्यक्रमांतर्गत ‘अभंगरंग’ या कार्यक्रमाच्या प्रारंभी पं. मकरंद हिंगणे यांनी आधी रचिली पंढरी या ...
नाशिक : ‘सप्तरंगोत्सव’ कार्यक्रमांतर्गत ‘अभंगरंग’ या कार्यक्रमाच्या प्रारंभी पं. मकरंद हिंगणे यांनी आधी रचिली पंढरी या अभंगाने कार्यक्रमात रंग भरले.
त्यानंतर ईश्वरी दसककर यांनी ‘पिभरे राम रसम’ ही रचना गायली. ‘येई वो विठ्ठले’ या अभंगाने ज्ञानेश्वर कासार यांनी या मैफलीत भक्तीचे रंग भरले. मराठी माणसावर ओवी आणि अभंग या दोन रचनाप्रकारांचा संस्कार संतांनी कसा केला आणि त्यामुळे काय घडले हे सांगणारी रचना पुष्कराज भागवत यांच्या स्वरात ऐकायला मिळाली. डॉ. आशिष रानडे यांनी 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ही प्रसिद्ध रचना गाऊन वेगळी आनंदानुभूती दिली. पं. अविराज तायडे यांनी गायलेल्या ‘इंद्रायणी काठी’ या अभंगाने अभंगरंग मैफलीची सांगता झाली. स्वानंद बेदरकर यांनी निरूपण केले.