संशोधनवृत्तीला संधी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:22 PM2019-12-26T23:22:58+5:302019-12-26T23:26:05+5:30

विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले.

The scholarship should be given a chance | संशोधनवृत्तीला संधी द्यावी

संशोधनवृत्तीला संधी द्यावी

Next
ठळक मुद्देदराडे : तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

येवला : विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले.
पंचायत समिती, तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि कांचनसुधा इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने आयोजित ४५ व्या येवला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कांचनसुधा शिक्षण संकुलात झालेल्या कार्यक्र माला गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, कांचनसुधाचे संस्थापक अजय जैन, मकरंद सोनवणे, श्रीकांत पारेख, अ‍ॅड. जुगलकिशोर कलंत्री, प्रताप आहेर, अक्षय जैन, डॉ. दर्शना जैन, रचना जैन, राणी भंडारी, समीक्षा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या तिन्ही गटात कांचनसुधा, नगरसूल आणि डी. पॉल शाळेने प्रथम क्र मांक मिळविला. तर परीक्षक म्हणून सी.डी. अहिरे, सुनील कोठावदे, पी. पी. साळी, जितेंद्र पगार, प्रसाद पंचवाघ यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्राचार्य किरण नागरे यांनी, तर सूत्रसंचालन फरीद पटेल, जेवियर पॉल यांनी केले. लता गायकवाड यांनी आभार मानले.
ंजिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सुनील मेहेत्रे, रामदास भवर, तालुकाध्यक्ष सुधीर आहेर, सुमेध कुर्हाडे, विजय चव्हाण, प्राचार्य विवेक रु पणार, समाधान औटे, पॅट्रिक अँथोनी, नीलेश परदेशी, नीरजा जंपपाला आदींनी संयोजन केले.

Web Title: The scholarship should be given a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.