शैक्षणिकप्रश्नांवर छात्रभारतीचे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:14 AM2018-09-23T01:14:05+5:302018-09-23T01:14:38+5:30

सर्वांना मोफत शिक्षण, विनाअनुदान धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छात्रभारती संघटनेने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

 Scholarships on academic issues | शैक्षणिकप्रश्नांवर छात्रभारतीचे निदर्शने

शैक्षणिकप्रश्नांवर छात्रभारतीचे निदर्शने

Next

नाशिक : सर्वांना मोफत शिक्षण, विनाअनुदान धोरण रद्द करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छात्रभारती संघटनेने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.  सध्या शिक्षण व बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असून, शिक्षण महाग झाल्याने विनाअनुदानित धोरणामुळे शिक्षकांचे संसार उघड्यावर पडू लागल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण मुला, मुलींना मोफत दिले जावे, राष्टय उत्पन्नाच्या किमान दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगाराची हमी सरकारने द्यावी, बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देण्यात यावा, मागेल त्याच्या हाताला काम मिळावे, शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राकेश पवार, समाधान बागुल, राम सूर्यवंशी, निवृत्ती खेताडे, सचिन भुसारे, देवीदास हजारे, सदाशिव गणगे आदींसह अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले होते.
विविध मागण्या
शिक्षणातील विनाअनुदान धोरण कायमचे बंद करावे, शिक्षणाचे कंपनीकरण, खासगीकरण बंद करावे, मराठी व रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, सच्चर कमिशन आयोगाचा अहवाल लागू करावा, एमपीएस्सी व यूपीएस्सीमार्फत भरल्या जाणाºया रिक्त जागा त्वरित भराव्यात, देशातील अंगणवाडी कर्मचाºयांना वेतन लागू करावा, शिक्षक व नोकर भरती करण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या.

Web Title:  Scholarships on academic issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.